करणीयमेत्तसुत्तं
करणीय मत्थ कुसलेन,यन्तं सन्तंपदं अभिसमेच्च।
सक्को उजू च सुजू च,सुवचो चस्स मुदु अनतिमानी ।।१।।
सन्तुस्सको च सुभरो च,अप्पकिच्चो च सल्लहुकवुत्ति ।
सन्तिन्दि्यो च निपको च,अप्पगब्भो कुलेसु अननुगिध्दो ।।२।।
न चं खुद्द समाचरे कित्र्चि,येन वित्र्त्रू परे उपवदेय्युं ।
सुखिनो वा खेमिनो होन्तु ,सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।।३।।
ये केचि पाणभूतत्थि,तसा वा थावरा वा अनवसेसा ।
दीघा वा ये महन्ता वा,मज्झिमा रस्सका अणुकथूला ।।४।।
दिट्ठा वा ये वा अदिट्ठा,ये च दूरे वसन्ति अविदूरे ।
भूता वा सम्भवेसी वा,सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।।५।।
न परो परं निकुब्बेथ, नातिमञ्ञेथ कत्थचि नं किञ्चि।
ब्यारोसना पटिघसञ्ञा, नाञ्ञमञ्ञस्स दुक्खमिच्छेय्य ॥६॥
माता यथा नियं पुत्तं, आयुसा एकपुत्त मनुरक्खे।
एवम्पि सब्ब-भुतेसु, मानसं भावये अपरिमाणं ॥७॥
मेत्तञ्च सब्ब-लोकस्मिं, मानसं भावये अपरिमाणं।
उद्धं अधो च तिरियञ्च, असम्बाधं अवेरं असपत्तं ॥८॥
तिट्ठं चरं निसिन्नो वा, सयानो वा यावतस्स बिगतमिद्धो।
एतं सतिं अधिट्ठेय्य, ब्रह्ममेतं विहारं इधमाहु ॥९॥
दिट्ठिं च अनुपगम्म, सीलवा दस्सनेन सम्पन्नो।
कामेसु विनेय्य गेधं, न हि जातु गब्भ सेय्यं पुनरेती’ति ॥१०॥
करणीयमेत्तसुत्तं सुत्त (मराठी अर्थ)
शांत पदाचे (निर्वाण) ज्ञान मिळवून ते पद प्राप्त करू पाहणाऱ्या आत्महितदक्ष माणसाचे कर्तव्य हे की,(त्याने आपले कर्तव्य पार पडण्यास) समर्थ, सरळात सरळ, मधुर बोलणारा, मृदू आणि निगर्वी व्हावे ।।१।।
आणि त्याने संतुष्ट पोसण्यास सुलभ, उलाढाली न करणारा, साधेपणाने वागणारा, शांतेन्द्री, हुशार, अधृष्ठ व कुटुंबविषयी जास्त लोभ न बाळगणारा व्हावे ।।२।।
जेणे करून सुज्ञ लोक इतरास दोष देतात, असे क्षुद्र आचरण करू नये. सर्व प्राणी सुखी, क्षेमी आणि आनंदित होवोत (अशी भावना करावी) ।।३।।
जे कोणी चर किंवा अचर, लांब किंवा मोठे, मध्यम, लहान, सूक्ष्म आणि स्थूल ते सर्व प्राणी ।।४।।
दिसणारे अथवा न दिसणारे आणि जे दूर व जवळ राहतात, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होतील ते सर्व प्राणी आनंदित होवोत ।।५।।
त्यापैकी कोणी एक दुसऱ्याला न ठकवो, कोणीही एक दुसऱ्याची अवज्ञा न करो. रागवण्याने व द्वेष बुद्धीने एक दुसऱ्याला दुःख देण्याची इच्छा न धरो ।।६।।
आई जशी एकुलत्या एक औरस पुत्राचे आपले आयुष्य खर्चूनही रक्षण करते, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी अमर्याद प्रेम बाळगावे ।।७।।
आणि सर्व लोकांविषयी वर, खाली, आणि चोहीकडे, अबाधक, अवैर आणि निःपक्षपाताची मैत्रीची अमर्याद भावना वाढवावी ।।८।।
उभा असता, चालत असता, बसला असता, अथवा अंथरुणात असता, जोपर्यंत निद्रा आली नाही तोपर्यंत ही (मैत्री भावनेची) स्मृती कायम ठेवावी, हिलाच इहलोकी सर्वश्रेष्ठ मैत्रीजीवन(ब्रह्मविहार) असे म्हणतात ।।९।।
मिथ्या दृष्टीचा अवलंब न करता, शीलवान आणि ज्ञानसंपन्न होऊन आणि विषयाचा लोभ सोडून दिल्याने तो खात्रीने पुनरपि गर्भवसाला येत नाही ।।१०।।
0 Comments