Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

जय मंगलअठ्ठ गाथा आणि अर्थ | Jaya mangal Attha gatha & its meaning !


 बाहुं सहस्स मभिनिम् मित सा युधं तं 

गिरि मेखलं उदित घोर ससेन मारं 
दानादि धम्म विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

मारातिरेक मभियुज् जित सा भ रत्तिम् 

घोरम्पन्-आलवक मक्ख मतद्ध यक्खं 
खन्ती सुदन्त विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

नालागिरिं गजवरं अतिमत्थ भूतं 

दावंगिचक्क मसनीव सुदारु नन्तं 
मॆत्तंबुसेक विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

उक्खित्त खग्ग मतिहत्थ सुदारुनंतं 

दावन्तियो जनपद-अंगुलिमाल वन्तं
इद्धीभि संखतमानो जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

कत्वान कत्थ मुदारं इवगब्भिनीया 

चिंचाय दुट्ठ वचनं जनकाय मज्झे 
संतेन सोम विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

सच्चं विहाय मती सच्चक वादकेयुम् 

वादाभिरो पि तनानं अति अन्ध भूतं 
पंज्ञा पदीप-जालितो जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

नन्दोपनन्द भुजगं विबुधम् महिद्धिं 

पुत्तेन थेर भुजगेन धम्मापयन्तो 
इद्धूपदेस विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

दुग्गाहदिट्थि भुजत्थ हत्थं 

ब्रह्मं विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं 
ज्ञानागदेन विधिना जित वा मुनिन्दो 
तं तेजसा भवतु ते जय मंगलानी

एता पि बुद्ध जय मंगल अट्ठ गाथा 

यो वाचको दिनदिने सरते मतन्दी 
हित्वान नेक विविधानि-छुपद्दवानि 
मॊक्खं सुखं अधिगमॆय्य नरो सपंज्ञो


अर्थ :- 
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हत्यार धारण करुन सहस्रबाहू गिरीमेखाला, हत्तीवर आरुढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला, आपल्या दान आदि धम्म बलाने जिंकले त्या तथागत बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठूर-ह्रदयी अशा आलवक नामक यक्षाला, शांती आणि संयम बलाने जिंकले त्या तथागत बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||२||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, अग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्तम अशा निलगीरी हत्तीला आपल्या मैत्रीरुपी पावसाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.||३||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणार्या अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या, आपल्या रिद्धी बलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||४||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने,पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला(जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती) आपल्या शांत आणि सौम्य बलानो जिंकले, त्या तथागत बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||५||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, सत्य सोडलेल्या व असत्य वादाचा पोषक, अभिमानी वादविवादात पारंगत व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला प्रज्ञा - दीपाने जिंकले त्या तथागत बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||६||

ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, विविध ऋद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामौद़ल्यायन शिष्याकडून ऋद्धी, शक्ती आणि उपदेशाच्या बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||७||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, भयंकर मिथ्थादृष्टीरुपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि ऋद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्रम्हज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या तथागत बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||८||

|| जो कोणी पाठक ह्या बुध्दाच्या आठ मंगल गाथा दक्षतापूर्वक दररोज म्हणेल तो बुध्दिमान पुरुष नाना प्रकारच्या. उपद्रवापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करील ||













Post a Comment

0 Comments