Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

सल्लसुत्त और उसका अर्थ | SallaSutta & Its Meaning !


 

सल्लसुत्त


अनिमित्त मनञ्ञातं, मच्चानं इध जीवितं ।

कसिरं च परित्तं च, तं च दुक्खेन  संञ्ञुतं ॥१॥


न हि सो उपक्कमो अत्थि, येन जाता न मिय्यरे ।

जरंम्पि पत्वा मरणं, एवं धम्माहि पाणिनो ।।२।।


फलानमिव पक्कानं, पातो पतनतो भयं ।

एवं जातानं मच्चानं, निच्चं मरणतो भयं ।।३।।


यथापि कुंम्भकारस्स, कता मत्तिकभाजना ।

सब्बे भेदनपरियन्ता, एवं मच्चान जीवितं ॥४।।


दहरा च महन्ता च, ये बाला ये च पण्डिता ।

सब्बे मच्चुवसं यन्ति, सब्बे मच्चु परायणा ॥५।।


तेसं मच्चुपरेतानं, गच्छतं परलोकतो ।

न पिता तायते पुत्तं, ञाति वा पन ञातके ॥६।।


पेक्खतं येव ञातीनं पस्स लाल पथं पुथु ।

एवमेव च मच्चानं, गो वज्ज्ञे विय निय्यति ।।७।।


एवमब्भाहतो लोको, मच्चुना च

जराय च ।

तस्मा धीरा न सोचन्ति, विदित्वा लोक परियायं ।।८।।


यस्स मग्गं न जानासि, आगतस्स गतस्स वा ।

उभो अन्ते असम्पस्सं, निरत्थं परिदेवसि ।।९।।


परिदेवया मानो चे,केचिदत्थं उदब्बहे ।

सम्मूळ्हो हिंस मत्तानं, कयिरा चेनं विचक्खणो ।।१०।।


न हि रुण्णेन सोकेन, सन्तिं पप्पोति चेतसो ।

भिय्यस्सुप्पज्जते दुक्खं, सरीरं उपहञ्ञति ।।११।।


किसो विवण्णो भवति,हिंसमत्तानमतना ।

 न तेन पेता पालेन्ति, निरत्था परिदेवना ॥१२।।


सोकमप्पजहं जन्तु, भिय्यो दुक्खं निगच्छति ।

अनुत्थुनन्तो कालकतं, सोकस्स वसमन्वगू ।।१३।।


अञ्ञापि पस्स गामिनो यथा कम्मूपगे नरे ।

मच्चुनो वस मागम्म, फन्दन्ते विध पाणिनो ॥१४।।

येन येन हि पञ्ञन्ति, ततो तं होति अञ्ञथा ।

एतादिसो विना भावो, पस्स लोकस्स परियायं ।।१५।।


अपि चे वस्ससतं जीवे, भिय्यो वा पन मानवो ।

ञातिसंघा विना होति, जहाति इध जीवितं ॥१६।।


तस्मा अरहतो सुत्वा,विनेय्य परिदेवितं। 

पेतं कालकतं दिस्वा, न सो लब्भा मया इति ।।१७।।


यथा सरणमादित्तं, वारिना परिनिब्बुतो

एवंपि धीरो सप्पञ्ञो, पण्डितो कुसलो नरो ।

खिप्पमुप्पतितं सोकं, वातो थुलं वा धंसये ।।१८।।


परिदेवं पजप्पं च, दोमनस्सं च अत्तनो ।

अत्तनो सुखमेसानो, अब्बहे सल्लमत्तनो ॥१९।।


अब्बूळ्ह सल्लो असितो,  सन्तिं पप्पुय्य चेतसो ।

सब्ब सोकं अतिक्कन्तो, असोको होति निब्बुतो ति ।।२०।।


सल्लसुत्त ( मराठी अर्थ )


 मर्त्यांचे इहलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय अल्प व दुःखाने मिश्रित आहे ।।१।।


कारण, असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मारणार नाहीत.म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे ।।२।।


पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय,

 तसेच जन्मलेल्या मार्त्यांना नेहमी मरणाचे भय असते ।।३।।


कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसान होते, तसे मर्त्यांच्या जीविताचे मृत्युत पर्यवसान होते ।।४।।


लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. सर्व मृत्यूपरायण आहेत ।।५।।


मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा आप्त आप्तांचे ---  करू शकत नाही ।।६।।


पाहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यांपैकी प्रत्येकजण वध्य गाईप्रणाने नेला जातो ।।७।।


 याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक घायाळ झाला आहे. हा एक लोकप्रकार आहे, हे जाणून शहाणे शोक करीत नसतात ।।८।।


ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत तुला दिसत नाहीत, अशा विषयी तू वृथा शोक करतोस ।।९।।


शोका पासून जर काही फायदा होण्यासारखा असेल, तरच (समूढ होऊन) वेडावून जाऊन व आपणास कष्टवून, शहाण्या माणसाने शोक करावा ।।१०।।


पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो ।।११।।


आपण स्वतःलाच त्रास देणारा तो कृश आणि निस्तेज होतो ---- मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही, म्हणून शोक व्यर्थ होय ।।१२।।


शोक न सोडणारा प्राणी, मरण पावलेल्यांची आठवण काढीत शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो ।।१३।।


मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मा नुसार जाणाऱ्या इतरही मनुष्य-प्राण्यांकडे पहा ।।१४।।


आपणाला हे असे असावे असे वाटते. पण ते भलतेच होते. अशा या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोकप्रकारच आहे हे पाहा ।।१५।। 


जरी मनुष्य शंभर वर्षे किंवा त्याहून जास्त जगला. तरी आप्तस्वकीयां पासून निराळा होतोच. इहलोकीच प्राण सोडतो ।।१६।। 


म्हणून अर्हन्ताचे वचन ऐकून आणि मृताकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण, असे जाणून शोक सोडून द्यावा ।।१७।।


जसे पेटलेले घर पाण्याने विझवावे, त्याप्रमाणे धैर्यवान, सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक, वारा कापसाला उडवितो, तद्वत झटदिशी नाहीसा करावा ।।१८।।


आपणास सुख मिळावे अशी इच्छा धारणाऱ्याने आपला शोक,लोभ आणि खिन्नता ही जी अंतकरणाची शल्ले, आहेत ती उपटून टाकावीत ।।१९।।


 हि शल्ले ज्याने काढून टाकलेली आहेत वजो अनासक्त आहे, तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोक रहित होतो आणि परिनिर्वाण पात पावतो ।।२०।।


Post a Comment

0 Comments