Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

दिक्षाभूमी चा देखावा, नाशिकरोड , जयंती 2022 (मराठी)

 बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव - 14 एप्रिल 2022 : देखावा - दीक्षा भूमी  : ठिकाण - नाशिकरोड!


खरतर ह्या वर्षीचा देखावा मला खूपच जास्त आवडला आहे कारण दीक्षा भूमी हा विषय माझ्यासाठी , भारतातील तमाम बौद्धां साठी खूप जवळचा व महत्त्वाचा विषय आहे कारण इथूनच बाबासाहेबांनी धम्मचक्र गतिमान केले , पूर्ण भारतातील मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांना समजले की आपलं अस्तित्व नेमकं आहे आणि जगात हा संदेश गेला की भारतातील क्रांतिकारी बुद्धांचा धम्म पुन्हा एकदा चरिका करत सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विषमते विरोधातील मानवतावादी आंदोलन पुढे नेईल !! नाग नदी , नागार्जुन टेकडी , नाग नदी , नाग कबिला , नाग राजे अश्या महत्वपूर्ण जागेत असलेली नागपूर मधील दीक्षा भूमी आज जगद्विख्यात आहे. ⚜️🔱🕉️


 बाबासाहेबांनी त्यावेळी दोन दिवसीय दीक्षेच्या कार्यक्रमाला ( 14-15 ऑक्टोबर ) सर्वांना शुभ्र वस्त्र परीधान करून बोलावले (समता सैनिक दलातील लोकांनाही) आणि त्या दिवशी "भारतीय बौद्ध जन समिती मार्फत" भगवी संस्कृती पुनर्जीवित केली !  एक बोधिसत्व , बोधी रत्न , ज्ञान सूर्य बुद्धाला शरण गेले ! (बुद्धांचा भगवा पुन्हा गतिमान केला / "भगवा" हे बुद्धांच एक नाव पन आहे - महामंगल सुत्त , श्रावस्ती!)


(भारतातील बहुजन समाज हा हजारो वर्षे शोषित पीडित गुलाम लाचार होता असे आज पण प्रचार करणाऱ्यांना ती एक चपराक आहे ! कारण बौद्ध पूर्वी राजे होते ! भारत बौद्धमय होता ! नागवंशी लोक येथील राजे होते ! प्रत्येक भारतीयाचा मूळ धम्म हा बुद्धांचा च होता ! महान सम्राट अशोका सारखे जगद्विख्यात राजांनी ह्या जम्बु द्विपावर राज केले आहे !! ) 


त्याच दीक्षा समारंभा वेळी एक खूप गंभीर बाब म्हणजे बोधिसत्व बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या 22 प्रतिज्ञा दिल्या - ज्या अजूनही जनतेला समजत नाहीये असं दिसून येत ! आपण बौद्ध की सर्वधर्म समभाव यात लोक अजून पण स्पष्ट दिसत नाहीयेत ! थोडक्यात बोधिसत्व बाबासाहेबांपेक्षा हुशार लोक झालेत !!

त्या सर्व लोकांना दीक्षा भूमी ही संदेश देते की तुम्ही सर्वधर्मसमभाव नाही तर "बौद्ध" आहात !!

आणि प्राचीन भारतातील व प्रत्येक भारतीयाचा मूळ धम्म हा बुद्धांचा धम्मच आहे ! 

आणि येथुनच बाबासाहेब बौद्धमय भारताचे मिशन सर्व मूलनिवासी बहुजनांना देतात !!


14 एप्रिल ला नासिक रोड ला जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना तीच दीक्षाभूमी संदेश देईन की तुम्ही "बौद्ध" आहात ! भगवी संस्कृती तुमची आहे ! तुम्हाला बौद्धमय भारताचे स्वप्न साकारायचे आहे ! आपली प्राचीन विरासत , प्रत्येक वास्तू वाचवून - धम्म क्रांती गतिमान करायची आहे !! आणि मुख्य बाब म्हणजे त्या दिवशी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा !! 

दीक्षा भूमी मुक्ती आंदोलन पण समोरच आहे !!!


( महत्वाचे - 22 प्रतिज्ञांचे एक मोठे पोस्टर जर तिथे लावले तर अनेक लोकांना समजेल की त्या दिवशी बाबासाहेबांच म्हणणं काय होत , आपण नेमके कोण आहोत , बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना करायला लावलेला धम्म प्रचार प्रसार नेमका काय  व दीक्षा भूमी कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला काय आठवलं पाहिजे ! दीक्षा भूमी व 22 प्रतिज्ञा हे समीकरण खूपच महत्वाचे आहे !)


बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे खूप खूप अभिनंदन की असा सुंदर दीक्षा भूमीचा देखावा ह्या वर्षी साकारला ! 

समिती अध्यक्षांना व उत्सवाच्या नियोजनासाठी साठी वेळ देणाऱ्या प्रत्येक बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याला खूप साऱ्या मंगलकामना 🙏


- धम्म प्रचारक - राहुल जगताप. #Struggle_Of_Revolution


Post a Comment

0 Comments